रोहित शर्मा सुसाट; भारत २ बाद २८२

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई : भारताची मजबूत स्थिती असताना राहुल पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही आउट झाल्याने धावसंख्या मंदावली आहे. दरम्यान पहिल्या जोडीने २१० धावांची भागीदारी करीत भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले.

दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा सामना होत असून भारत पहिली फलंदाजी करीत आहे. यावेळी रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे. पण या मॅचमधील पहिलाच चेंडूचा सामना करण्यात विराटला अपयश आले. किरोन पोलार्ड पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर विराटला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला.

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी वेस्ट इंडिजसाठी दुखापत ठरत असताना अलझारी जोसेफने भारताला पहिला झटका दिला. जोसेफने शतकी खेळी करत बॅटिंग करणाऱ्या राहुलला रोस्टन चेसकडे झेलबाद केले. राहुलने १०४ चेंडूत १०२ धावा केल्या. सध्या मैदानावर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *