नागपूर कसोटी : पहिल्या सत्रातच श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

0
नागपूर | भारतीय फलंदाजांची सुरेख फटकेबाजी, टीम इंडियाचे विराट द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने ६ बाद ६१० धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर इशांत शर्माने पहिला झटका दिला.

आज श्रीलंकेची इनिंग सुरु झाली तेव्हा पहिल्या सत्रातच श्रीलंकेच्या चार विकेट पडल्या त्यामुळे भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

भारताकडे ४०५ धावांची निर्णायक आघाडी घेत काल सायंकाळी श्रीलंकेला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. श्रीलंकेच्या पारीतील पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर इशांत शर्माने श्रीलंकेला पहिला धक्का दिला.

त्यानंतर आज सकाळी सुरु झालेली श्रीलंकेची फलंदाजी पहिल्या सत्रातच ढेपाळली. उमेश यादव, रवींद्र जाडेजाच्या अचूक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या संघाने गुढघे टेकले.

पहील्य सत्रातच श्रीलंकेच्या तीन विकेट घेण्यात भारताच्या गोलंदाजांना यश आले. त्यामुळे भारतीय संघाने विजयाकडे वाटचाल केली आहे.
पहिल्या कसोटीत झुंजार शतकी खेळी करणाऱ्या विराटने दुसऱ्या कसोटीतही आपल्या फलंदाजीतील लय कायम राखत द्विशतक साजरे केले.

चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा यांनीही शतकीय पारी खेळल्यामुळे भारताची स्थिती मजबूत झाली असून भारत विजयाच्या समीप आलेला आहे.

LEAVE A REPLY

*