आज भारत श्रीलंका दुसरी लढत; दुपारी दोन वाजेपासून होणार सुरुवात

0
भारतीय संघ आज श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामना आज दुपारी दोन वाजेपासून सुरु होणार आहे. पहिला सामना नऊ विकेट्सने जिंकल्यामुळे भारत सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. श्रीलंकेचा संघ सलग परावभवामुळे काहीसा दबावात आहे याचा फायदा टीम इंडियाला होणार आहे.

याआधी श्रीलंकेतील कसोटी मालिकेत 3-0 ने विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या सततच्या पराभवामुळे श्रीलंकन क्रिकेट चाहते इतके नाराज झाले की त्यांनी श्रीलंकन संघाच्या मैदानाबाहेर पडलेल्या बसला अर्धा तास राडा घातला होता.

संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी संघाच्या खराब कामगिरीचे कारण संघाचे मॅनेजर असांका गुरुसिंघे असल्याचे सांगितले. भारतीय सलामी फलंदाज शिखर धवनने नाबाद 132 धावा करून श्रीलंकन गोलंदाजांवर जो दबाव निर्माण केला त्यातून ते सावरू शकले नाही.

तर कर्णधार कोहलीनेदेखील नाबाद 82 धावा बनवून विजय सोपा केला होता. कुलदीप यादवला मनीष पांडे, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांच्याबरोबर संंघाबाहेर राहावे लागले.

कोहली फलंदाजी क्रमात बदल करण्याची शक्यता आहे. श्रीलंकन संघ टीम इंडियाला पराभूत करू न शकल्यामुळे निवड प्रक्रियेवरदेखील आक्षेप घेण्यात येत आहे.

श्रीलंकेला 2019 मध्ये होणार्‍या विश्वचषकात प्रवेश मिळवण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. कारण 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना वेस्ट इंडिज संघाने मागे टाकू नये. यासाठी त्यांच्या फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा लागेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात 28 व्या षटकापर्यंत श्रीलंकेचे 150 धावांवर 3 बळी गेले होते. धनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला आणि कुशाल मेंडिस यांनी भारतीय वेगवान गोलंदाजांचा चांगला सामना केला होता. मात्र खालच्या फळीतील फलंदाजांनी त्यावर पाणी फिरवले होते.

LEAVE A REPLY

*