१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | पारंपरिक  कट्टर प्रतिस्स्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे आशिया  चषकात  येत्या  १९ सप्टेंबर  रोजी  एकमेकांसोबत  भिडणार आहेत. पण, हे  दोघे  आशिया  चषक  क्रिकेट  स्पर्धेत  भारत पाक क्रिकेट  मतच म्हणजे  एक प्रकारचें  युद्धच  हे युद्ध  प्रत्येक वेळेस अत्यंत  अटीतटीचे  आणि  उत्कंठावर्धक  असते  दोन्ही संघांचे  खेळाडू  हे  मैदानाबाहेर  एकमेकांशी  मित्रत्वाने  वागतात.

मात्र,  मैदानात  अत्यंत खुनशी  नजरेतून बघतात.  भारतीय  क्रिकेट  प्रेमींचे  आपल्या  लाडक्या  बाप्पाकडे  प्रत्येक स्पर्धेत  एकाच मागणे  असते. आशिया चषक भारत जिंकला नाही तरी चालेल, पण भारत पाकिस्तानसोबचा क्रिकेट सामना जिंकायला हवा.

भारतीय  संघ  येत्या  दीपावलीत  म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात  ऑस्ट्रेलिया  दौऱ्यावर  जाणार आहे.  या  परिस्थितीत  भारतीय  संघ  निवड समितीने  आपला  १६ सदसीय  वनडे  संघ  जाहीर  केला  असून यात त्यांनी  नियमित  कर्णधार  कोहलीला मात्र आराम दिला आहे.

टीम इंडियाचा हिटमॅन मुंबई इंडियन्स  संघाचा  कर्णधार व भारतीय  वनडे  आणि टी   २० संघाचा  सलामी फलंदाज रोहित  शर्मा  टीमचा कर्णधार असणारा आहे.

तर दुसरीकडे  पाकिस्तानचा  माजी  कर्णधार आणि मधल्या  फळीचा  अनुभवी फलंदाज  शोएब  मलिक  याने  आपल्या  ट्विटर  वॉर स्पष्ट  केले  आहे.

की, यंदाच्या  स्पर्धेचे  जेतेपद जिंकण्यासाठी  आम्ही पूर्ण  प्रयत्न  करू  पाक संघाचा  नाव कर्णधार  सर्फराज अहमद  याच्या  नेतृत्वात पाक संघाने गतवर्षी चॅम्पिअनस  करंडक स्पर्धेवर आपले  नाव  कोरले  होते. हा  सामना  भारतीय  प्रमाणवेळेनुसार  दुपारी साडे तीन वाजता  स्टार स्पोर्ट्स  वाहिनीवर दिसणार आहे.

  • सलिल  परांजपे, नाशिक.

 

LEAVE A REPLY

*