भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका; आज रंगणार पहिला सामना

0
टी२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये आता एकदिवसीय मालिकांचा थरार आजपासून रंगणार आहे.

भारताविरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना नाॅटिंगहॅम येथे होणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ५:०० वाजता सोनी सिक्स वर पाहता येतील.

नाॅटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना रंगणार आहे. या मैदानावर विजय मिळविण्याच्या इराद्याने भारत मैदानावर उतरणार आहे. तर यजमान इंग्लंड भारताची विजयी घोडदौड रोखण्यासाठी वेगवेगळ्या पैलूंचा वापर करून आणि स्थानिक मैदानांचा अभ्यास करून टक्कर देण्यासाठी मैदानात उतरेल.

भारतीय संघाने आत्तापर्यंत या मैदानावर दोन सामने खेळले असून दोन्ही लढतीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही सामन्यांत निर्णायक विजय मिळवला आहे.

इंग्लंड प्रीमियर लीग संघ नाॅटिंगहॅम याठिकाणी टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. जागतिक वनडे क्रमवारीत इंग्लंड १२५ आणि भारत १२२ गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. आत्तापर्यंत समोरासमोर ४७ वेळा झालेल्या सामन्यात इंग्लंडचा २३ तर भारताला २२   सामन्यांमध्ये विजयश्री प्राप्त झाला आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेद्रसिंग धोनी, सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन, अष्टपैलू हार्दिक पंड्या, चायनामन गोंलदाज कुलदीप यादव यांच्यावर भारतीय संघाची मदार असून सर्वच चांगल्या फॉर्ममध्ये सध्या कामगिरी करत आहेत.

तर तिकडे जेसन रॉय, जॉय रूट, इऑन मॉर्गन, ब्रेस्ट्रो, जॉस बटलर हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शैलीदार फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या बेन स्ट्रोक्सच्या पुनरागमनामुळे संघ अधिक मजबूत झाला आहे. इंग्लंडची सतत ढेपाळणारी गोलंदाजी इंग्लंडचा अडचणीचा विषय होऊ शकतो.

– सलील परांजपे, नाशिक

खबरदार घरात 100 युनिटपेक्षा जास्त विज वापराल तर…..

LEAVE A REPLY

*