भारत-अफगाणिस्तान कसोटी : शिखर बनला पहिल्या सत्रात शतक ठोकणारा पहिला फलंदाज

0
बंगळूर : चिन्हास्वामी स्टेडीयम येथे सुरु असलेल्या अफगाणिस्थान आणि भारत यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

कर्णधार अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात भारतीय फलंदाजांनी पहिल्या सत्रात शतकीय भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.

विशेष म्हणजे भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनने पहिल्या सत्रात सेन्चुरी ठोकली. यामुळे पहिल्या सत्रात सेन्चुरी ठोकणारा शिखर भारतातील पहिला तर जगातील सहावा खेळाडू ठरला.

उपहारापूर्वी खेळ थांबला त्यावेळी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होते.

LEAVE A REPLY

*