Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

क्रिकेट विश्वचषक २०१९ : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना; भारताची फलंदाजी

Share

साउथँम्पटन । आज क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना होत आहे. हा सामना साउथँम्पटन येथील द रोज बॉल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात आज एक बदल केला आहे. आज भारतीय संघांच्या 11 जणांमध्ये दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार ऐवजी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या 11 जणांच्या संघात नूर अली ऐवजी हजरतूल्लहा झझाईला तर दवलत झादरन ऐवजी अफताब आलमला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात पहिल्यांदाच आमने-सामने आले आहेत. दुपारी तीन वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल. या विश्वचषकात भारतीय संघाने आत्तापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तसेच अफगाणिस्तान संघाने अजून या विश्वचषकात एकही सामना जिंकलेला नाही.

असे आहेत 11 जणांचे संघ

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान – हजरतुल्लाह झझाई, गुलबदीन नाईब (कर्णधार), रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, असगर अफगान, मोहम्मद नबी, इक्रम अली खिल (यष्टीरक्षक), नजीबुल्लाह झद्रान, रशीद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!