2024 मध्ये भारत ‘नंबर 1’

0
नवी दिल्ली । दि.22 । वृत्तसंस्था-2024 पर्यंत चीनला भारत लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकतो. भारताची लोकसंख्या 2030 पर्यंत दीडशे कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता संयुक्त राष्ट्राकडून वर्तवण्यात आली आहे.
2017 मधील लोकसंख्येची समीक्षा करुन संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिकविषयक विभागाने अहवाल तयार केला असून चीनची लोकसंख्या सध्या 141 कोटी ऐवढी आहे.
तर भारताची लोकसंख्या 134 कोटी ऐवढी आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19 टक्के लोक चीनमध्ये, तर 18 टक्के लोक भारतात राहतात, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

2024 च्या आसपास भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल, अशी शक्यता संयुक्त राष्ट्रने अहवालातून आकडेवारीसह वर्तवण्यात आली आहे.

लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा संयुक्त राष्ट्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा 25 वा अहवाल आहे. यामध्ये भारत 2022 मध्येच चीनला मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मात्र यंदाच्या अहवालानुसार भारत 2024 च्या आसपास चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकतो.

 

 

LEAVE A REPLY

*