Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकरोना संकट : आत्मनिर्भर भारत अभियानसाठी 20 लाख कोटी

करोना संकट : आत्मनिर्भर भारत अभियानसाठी 20 लाख कोटी

सार्वमत

लॉकडाऊनचा चौथा टप्पा नव्या नियमांचा, नियम 18 मे पूर्वी सांगितले जातील

- Advertisement -

नवी दिल्ली – करोना संकाटाचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानसाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जीडीपीच्या सुमारे 10 टक्के हे पॅकेज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले.

हे पॅकेज दिवसरात्र मेहनत करणारे शेतकरी, मध्यमवर्गीय, कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु-मध्यम उद्योग, एमएसएमई उद्योग जगतासाठी आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये जमीन, मजूर, लिक्विडिटी, कायदा यावर भर दिला आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा नव्या नियमांचा असेल. नियमांचे पालन करत कोरोनाशी लढत पुढेही जायचे आहे. लॉकडाऊन 4.0 चे नियम 18 मे पूर्वी सांगितले जातील, असेही मोदी यांनी सांगितले

करोना महामारी सुरू होऊन आता चार महिने झाले आहेत. जगभरात 42 लाखांहून अधिक लोक करोनाबाधित आहे. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. मी या सर्वांप्रती आपली संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसनं जगाला उद्ध्वस्त केले आहे. जगभरात करोडो लोक संकाटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलंय ना ऐकलंय… निश्चितपणे मानवजातीसाठी हे सगळं अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. थकवा, हरणं, तुटणं मानवाला मंजूर नाही. सतर्क राहताना नियमांचं पालन करत यापासून संरक्षण करून पुढे वाटचाल करायची आहे. जग संकटात असताना आपला संकल्प आणखीन मजबूत करायला हवा. संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली.

21 वं शतक भारताचं आहे, असं मागच्या शतकापासून आपणं ऐकत आलोय. करोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती आपण न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर 21 वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर ही आपली जबाबदारीही असावी. जागतिक स्थिती आपल्याला एकच मार्ग दाखवतेय. ‘आत्मनिर्भय भारत’ असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या