मनमाडमध्ये भारत-पाक सामन्यामुळे नाराजी

0
मनमाड(प्रतिनिधी): भारत पाकिस्तान सोबत क्रिकेट मैच खेळत असल्यामुळे शहरातील मुस्लिम संघटना व सर्वसामान्य मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे पाकिस्तान भारतात रोज अतिरेकी पाठवून अशांतता माजवत आहे. ज्या देशामुळे आपले जवान शहीद होत असताना अशा शत्रू देशा सोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे असा प्रश्न मुस्लिम समाजा तर्फे उपस्थित केला जात आहे.

या अगोदर केंद्रात काँग्रेस प्रणित आघाडी सरकार सत्तेवर असतांना त्यावेळी भाजप, शिवसेना,यासह इतर काही संघटनांनी भारत- पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्यांना कडाडून विरोध केला होता.

आज ही पाकिस्तान भारतात अतिरेकी पाठवत आहे. त्यांच्याशी लढतांना आपले जवान रोज शहीद होत आहे असे असतानाही भारत-पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत आहे याला काय म्हणावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

केंद्र विशेषतः भाजप व शिवसेनेचं हा दुटप्पीपणा नाही का? असा प्रश्न केवळ मुस्लिमच नव्हे तर इतर अनेक नागरिक उपस्थित करीत असून सत्ता मिळाल्यानंतर विचार बदलतात. असेच दिसून येत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*