यंदा मान्सून दिलासादायक; हवामान खात्याची पत्रकार परिषद

0

मुंबई | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असल्याचे सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाकडून नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

यंदा मान्सून समाधानकारक राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे ते म्हणाले. हवामान खात्याकडून यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटकडून वर्तीविण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचे सांगितल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

*