भारताच्या स्वातंत्र्यदिनी गुगलचे खास डुडल

0
मुंबई : आज देशभरात ७२व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुगलनं देखील एक खास डुडल साकारत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील ट्रकवर करण्यात येणारी कलात्मक सजावट पाहण्यासारखी असते. त्याचाच आधार घेत गुगलनं हे डुडल साकारलं आहे. गुगलनं या डुडलमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ आणि आशियातील हत्तींसोबत रंगीत फूल अन् उगवता सूर्य दाखवला आहे. गुगलनं अनोखं रंगतदार डुडल तयार करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

*