Type to search

क्रीडा

विश्‍वचषक : रोमहर्षक लढतीत भारताची अफगाणिस्तानवर मात

Share

साऊथॅम्पटन – अफगाणिस्तानसारख्या अनुभवी संघांने भारतला चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने 11 हा धावांनी विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी दमदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजीला 224 धावात रोखले. कर्णधार विराट कोहलीने 67 आणि केदार जाधवने 52 धावांची खेळी केली.

माफक धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला मोहम्मद शामीने हजरतुल्ला झझाईचा त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार गुलबदीन नईब आणि रहमत शाहने 44 धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु हार्दिक पांड्याने नईबला 27 धावांवर बाद केले. त्यानंतर रहमत यांनी अफगाणिस्तानला त्यानंतर आलेल्या हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाहने अफगाणिस्तानचे शतक धावफलकावर लावले. परंतु ही जोडी बुमराहने फोडली. रहमत 36 धावांवर बाद झाला. तर त्यापाठोपाठ हशतुल्ला 21 धावांवर बाद झाले. या दोघांनी 42 धावांची भागीदारी केली. चहलने असगर अफगाणचा त्रिफळा उडवत अफगाणिस्तानचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

मोहम्मद नबीने नजीबुल्लाह झरदानच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 36 धावांची आणि नंतर राशिद खानच्या साथीने 24 धावांची भागिदारी रचली. हार्दिक पांड्याने झरदानला (21) तर चहलने राशिद खानला (14) बाद करत सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. विजयासाठी 18 चेंडूत 23 धावांची गरज असताना शामीने 48 व्या षटकात फक्त 3 धावा दिल्याने नबीवर दबाव वाढला. त्यानंतर बुमराहने 49 व्या षटकात फक्त 5 धावा ता अखेरच्या षटकात तिसर्‍या चेंडूवर शामीने नबीला बाद करत सामना भारताच्या बाजूला झुकवला. नबीने झुंजार खेळी करत 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या आफताब आलमचा आणि मुजीबचाही त्रिफळा उडवत विश्‍वचषकातील आपली पहिली हॅटट्रिक करत भारताला 1 चेंडू आणि 11 धावांनी विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 213 धावात गारद झाला.

तत्पूर्वी त्याआधी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने 30 धावा केल्या.

या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने 48 चेंडूत अर्धशतक झळकावले. चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. 41 चेंडूत 29 धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली 63 चेंडूत 67 धावा करून माघारी गेला. विराटने 5 चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने 3 चौकारांसह 52 चेंडूत 28 धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील 68 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नबी, नैब यांनी 2-2 तर मुजीब, आलम, रहमत शाह आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.

राशिद खानने चांगला मारा करत 10 षटकात 1 षटक निर्धाव टाकत 38 धावात धोनीची महत्वाची विकेट घेतली. त्याला नईब आणि नबी यांनी 2 तर मुजीब, आलम आणि रहमत यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

धावफलक
भारत : 224/8 (50 षटकांत)
फलंदाजी : लोकेश राहुल 30 (53), रोहित शर्मा 1 (10), विराट कोहली 67 (63), विजय शंकर 29 (41), महेंद्रसिंग धोनी 28 (52), केदार जाधव 52 (68), हार्दिक पंड्या 7 (8), मोहम्मद शमी 1 (2), कुलदीप यादव नाबाद 1 (1), जसप्रीत बुमराह नाबाद 1 (1), अतिरिक्त 7
गोलंदाजी : मुजीब उर रहमान (10-0-26-1), आफताब आलम (7-1-54-1), गुलबदीन नैब (9-0-51-2), मोहम्मद नबी (9–0-33-2), राशिद खाद (10-0-38-1), रहमत शाह (5-0-22-1),

अफगाणिस्तान : 213 (49.5 षटकात)
फलंदाजी : हजरातुल्लाह जजई 10 (24), गुलबदीन नैब 27 (42), रहमत शाह 36 (63), हशमतुल्लाह शाहीदी 21 (45), असगर अफगान 8 (19), मोहम्मद नबी 52 (55), इक्रम अलिखिल नाबाद 7, आफताब आलम 0 (1), मुजीब उर रेहमान 0 (1), अतिरिक्त 17
गोलंदाजी : मोहम्मद शमी (9.5-1-40-1), जसप्रीत बुमराह (10-1-39-2), यजुर्वेद चहल (10-0-36-2), हार्दिक पंड्या (10-1-51-2), कुलदीप यादव (10-0-39-0)

कोहलीची अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी
कर्णधार विराट कोहलीने अफगाणी गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी खेळीची नोंद केली. विराटने 63 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 67 धावा केल्या. या कामगिरीसह विराटने 27 वर्षांपूर्वी भारतीय कर्णधाराने केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. 1992 साली भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सलग 3 सामन्यांत अर्धशतक झळकावले होते. यानंतर तब्बल 27 वर्षांनी विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात विराटने 82, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात 77 तर अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात 67 धावा केल्या. विराटने दुसर्‍या विकेटसाठी लोकेश राहुलसह 57 आणि तिसर्‍या विकेटसाठी विजय शंकरसह 58 धावांची भागीदारी केली. दरम्यान त्याने वन डे क्रिकेटमधील 52 वे अर्धशतकही पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे चौथे, तर अफगाणिस्तानविरुद्ध पहिलेच अर्धशतक ठरले.

रोहितला नकोसा मान, रेहमानचा पराक्रम

विश्‍वचषकाच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणार्‍या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. यंदाच्या विश्‍वचषकात प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या विश्‍वचषकात फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे तर मुजीब पहिला फिरकीपटू.

धोनीवर नेटकरी संतापले
विराट कोहली आणि केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरुन मोठी खेळी करु शकला नाही. या सामन्यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी धोनीला चांगलच ट्रोल केले आहे. धोनीने 52 चेंडू खर्ची घालत केवळ 28 धावा केल्या. त्याच्या या खेळीत केवळ 3 चौकारांचा समावेश होता. ज्यावेळी भारताला धावसंख्या वाढवण्याची गरज होती, त्यादरम्यान धोनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी धोनीला चांगलेच उपरोधिक सल्ले दिले आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!