Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

भारताने आमची एफ-१६ विमाने खरेदी करावीत

Share

वॉशिंग्टन : भारताने रशियाशी नुकताच एस 400 हा संरक्षण क्षेत्रातील महत्वाचा करार केला आहे. त्यानंतर अमेरिका भारतवार नाराज आहे. तसेच अमेरिकेने भारतावर निर्बंध लादण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आता निर्बंध टाळण्यासाठी अमेरिकेकडून अनौपचारिक प्रस्ताव देण्यात आला आहे. भारताला निर्बंध टाळायाचे असतील तर त्यांनी आमच्याकडून एफ 16 ही लढाऊ विमाने खरेदी करावी, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

भारतने अमेरिकेकडून ही विमाने खरेदी केल्यास अमेरिका निर्बंध लादणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, तीन दशकांपासून अमेरिका पाकिस्तानला ही विमाने देत आहे. तसेच स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी ही विमाने योग्य नसल्याने भारत या विमानांच्या खेरदीसाठी इच्छुक नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मैटिस यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या करारावर ट्रम्प प्रशासनाच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारामन डिसेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. मात्र, त्यावेळी जेम्स मैटिस ट्रम्प प्रशासनाचा भाग असतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. जेम्स मैटिस यांनी सीएएटीएसएनधून भारताला सूट देण्याचे नेहमीच समर्थन दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!