Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

भारताविरुद्ध चीन वापरणार रोबो सैनिक

Share

14 हजार फुटांवर केला युद्ध सराव

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानला साथ देणार्‍या चीनने आता भारताविरुद्ध सैनिक म्हणून रोबोटचा वापर करण्याची तयारी केली आहे. या रोबो सोल्जरचा सराव पश्चिमेला असणार्‍या शेजारी देशाच्या सीमेजवळच्या बर्फाच्छादित पाठारावर घेतल्याचे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यांनी सांगितले आहे. मात्र नक्की हा सराव कोणत्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी 14 हजार फुटांवर असणार्‍या पठारावर अनेक दिवस हा सराव सुरु होता अशी माहिती सरकारी प्रसारमाध्यांनी दिली आहे.

एखाद्या पठरावर युद्ध करण्याचा सराव नुकताच चीनच्या सैन्यदलाने केला. या सरावादरम्यान चीनने पहिल्यांदाच आपल्याकडील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावी मारा करणार्‍या शस्त्रांचा वापर केला. चीनकडे असणार्‍या टाइप 99 ए या आधुनिक रणगाड्यांबरोबरच युद्धभूमीवर वापरता येईल अशा रोबो सोल्जरचाही या सराव अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला, अशी माहिती चायना सेंट्रल टेलिव्हिजनने (सीसीटीव्ही) या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!