नाशकात शुक्रवार पासून ‘इंडएक्स्पो’

0
सातपूर | दि.१३ प्रतिनिधी- इंदोर इन्फोलाईन प्रा. ली. या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेद्वारे येत्या १६ ते १८ जून दरम्यान ठक्कर डोम येथे भव्य औद्यागिक प्रदर्शन इंडेक्स्पो चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक श्री राजकुमार अग्रवाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

इंदोर इन्फोलाईन द्वारे राज्यात नागपूर, औरंगाबादसह राज्याबाहेर रायपुर, इंदूर, हैद्राबाद, जमशेदपूर या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन सातत्याने केलेले आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पूण्या पाठोपाठ नाशिक व औरंगाबाद वेगाने विकसित होणारी शहरे असल्याने याठिकाणी यंदा पहिले प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.

या प्रदर्शनात नाशिक मधील बीडीएस जर्मनी, ग्रीव्ज कॉटन, एम.बी.टेक, बजाज स्टील, सी. आर.आय.पंप, इंसाइज इंडिया , ब्रोश कटर, एप्शन इंडिया, लावास ल्युब्स, मेगटेक, एस.पी.क्रेन अशा अनेक नामांकित कंपन्या सहभागी होत असल्याचे श्री अग्रवाल यांनी सांगितले.  सुमारे १०० स्टॉल्सच्या माध्यमातून सहभागी कंपन्या इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्वीच गिअर , गिअर्स व पंप, वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशिनरीज , पॉवर टूल्स , कटिंग टूल्स , बांधकाम उपकरणे मांडणार आहेत.

सकाळी ११ ते २ दरम्यान व्यावसायिक तसेच संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान सामान्य दर्शकासाठी प्रदर्शन खुले राहणार आहे. सदर प्रदर्शनातील प्रवेश दर्शकांकारीता पूर्णपणे मोफत असून उद्योगवाढीसाठी याचा निश्चित उपयोग होईल. नागरीकांनी व उद्योजकांनी मोठठ्यज्ञा संख्यने प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन राजकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*