Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरासह जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळेत तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकावून वंदे मातरम, जय हिंद, भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.  नाशिक शहरात काही ठिकाणी प्रभातफेऱ्या काढून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सकाळी ध्वजारोहण झाले. त्यानंतर एनसीसी, एमसीसी, स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी संचलन केले.  लहान विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत पार पडल्यानंतर पेढे आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

सोशल मीडियात देशभक्ती 

रात्री बारा वाजल्यापासून सोशल मिडीयात देशभक्ती ओसंडून वाहत आहे. प्रत्येक ग्रुप देशभक्तीने फुल्ल झाले आहेत. रक्षाबंधनही आजच आल्यामुळे भावबहिणीच्या प्रेमाने स्वातंत्र्यदिनात अधिकच भर घातली.

व्यावसायिकांची सवलत योजना

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील काही व्यावसायिकांनी अन्न पदार्थांवर विशेष सवलत दिली आहे. यामध्ये सामोसे दोन घेतले तर त्यावर एक फ्री मिळाले असे फलक सकाळी झळकले होते,. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आजचा नाश्ता सवलतीतल्या समोस्यांवर ताव मारत केला. मोठी गर्दी या दुकानांमध्ये झाली होती.

सिग्नलवर फुगे, तिरंगा विक्रीसाठी मोठी झुंबड

नाशिक शहरामध्ये असलेल्या सिग्नल्सवर अनेक व्यावसायिकांनी तिरंगा, फुग्यांचे तिरंगा विक्रीसाठी झुंबड उडवली होती. मिनिटभराच्या सिग्नलमध्ये थांबलेल्या अनेक नाशिककरांनी आज या व्यवसायिकांकडून तिरंगा आणि फुगे खरेदी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!