Friday, May 3, 2024
Homeनगरनुकसान भरपाई : नेवाशात 16 लाखांचा अपहार

नुकसान भरपाई : नेवाशात 16 लाखांचा अपहार

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळविल्याप्रकरणी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार विजयलाल सुराणा यांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रक्कम 16 लाख 14 हजार रुपये आहे.

- Advertisement -

योजनेच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाचे अंतर्गत वेगवेगळ्या सजा व गावचे तलाठी हे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी/ टंचाई च्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे शेताचे पंचनामे करून त्यानुसार यादी सादर करीत असतात सदर प्राप्त यादीच्या अनुषंगाने संबंधित कामकाज पाहणारे महसूल सहाय्यक व अव्वल कारकुन हे दोघेजण यादीत नमूद केल्यानुसार शेतकरी निहाय / बँक निहाय धनादेश तयार करून सदर धनादेशाचे संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करणेकामी सदरचे धनादेश बँकेत जमा करण्याकरिता संबंधित गावचे तलाठी व कोतवाल यांचे कडेस दिले जातात.

त्यानुसार देडगाव या गावातील लाभार्थी शेतकर्‍यांचे धनादेश श्री. राजेंद्र दगडु वाघमारे, महसूल सहाय्यक यांनी देडगावचे कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांना बोलावून सदरचे धनादेश बँकेत जमा करणेबाबतच आदेश दिले होते त्यावरून संबंधित कोतवाल अविनाश हिवाळे यांनी देडगाव गावाचे धनादेश बँकेत जमा करण्याकामी ताब्यात घेतले होते.

तसेच काही धनादेश कोतवाल नामे अविनाश हिवाळे याने जेऊर हैबती येथील कोतवाल राजु इनामदार यास घेऊन येणे बाबत कळविले व त्यानुसार काही धनादेश हे राजु इनामदार करवी प्राप्त करुन घेतले तर काही धनादेश हे स्वतः तहसिल कार्यालयात येऊन प्राप्त करण्यात आले. देण्यात आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करून े धनादेश बॅकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बँकेचे नाव ऐ. डी. सी. सी. बँक कुकाणा असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 165800/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 25सप्टेंबर2021 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविण्यासाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला.

नगर अर्बन बँक शाखा कुकाणा, बॅक ऑफ बडोदा शाखा भेंडा, बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदनगर बँकांमध्येही बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात आला. लाभार्थी यादीत बदल करुन अतुल अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 60257278829 यावर रक्कम रुपये 26700/- बेकायदेशिरपणे वळवण्यात आली.

देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करुन त्यातील अ.क्र. 973 चे धनादेश हा स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सावेडी बँकेच्या नावे देणेत आला होता. त्यामध्ये बॅकेचे नाव बॅक ऑफ महाराष्ट्र बँक शाखा सावेडी असे खाडाखोड करुन व रक्कम रुपये 224512/- अशी रक्कमे मध्ये वाढ करुन दिनांक 29/04/2022 अशी दुरुस्ती करुन व तहसिलदार म्हणुण आम्ही दुरुस्ती करण्यात आली आहे असे भासविणेसाठी बनावट शिक्का व सही करुन परस्पर खाडाखोड केलेल्या बँकेमध्ये जमा करण्यात संबंधित बॅकेचे मॅनेजर व कॅशिअर यांनी कोणतीही खातरजमा न करता परस्पर सदरचे धनादेश हे कोतवाल नामे अविनाश हिवाळे यांचे सुचनेनुसार ऐ.डी.सी.सी कुकाणा टाऊन बँकेतील खातेधारक नावे रामनाथ दत्तु गोयकर यांचा खातेक्रमांक 4235 यावर रक्कम रुपये 23685/- इतकीबेकायदेशीरपणे वळवण्यात आल. विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8103 यावर रक्कम रुपये 24685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. अलका चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3414 यावर रक्कम रुपये 15625/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. विकास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8099 यावर रक्कम रुपये 25685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. चंद्रभान नाना हिवाळे यांचा खातेक्रमांक 3129 यावर रक्कम रुपये 26187/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

ऐ.डी.सी.सी देवगाव बँकेतील खातेधारक नावं-. आशोक सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 2637 यावर रक्कम रुपये 23685/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. सुर्यभान सदाशिव जाधव यांचा खातेक्रमांक 1432 यावर रक्कम रुपये 26188/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

नगर अर्बन बॅक शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक नावं- विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 4712 यावर रक्कम रुपये 92481/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. सविता अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 5915 यावर रक्कम रुपये 94218/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. फकिरचंद तुकाराम हिवाळे यांचा खातेक्रमांक 6199 यावर रक्कम रुपये 26241/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.अविनाश चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3782 यावर रक्कम रुपये 84512/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

बँक ऑफ बडोदा शाखा भेडा बँकेतील खातेधारक नावं-प्रविण उत्तमराव बागडे यांचा खातेक्रमांक 11298100010683 यावर रक्कम रुपये 50000/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. दयानंद सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 11290100019922 यावर रक्कम रुपये 15720/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्र रेल्वे स्टेशन औरंगाबाद बँकेतील खातेधारक नावं- रफिक गणी सैयद यांचा खातेक्रमांक 60398788320 यावर रक्कम रुपये 195712/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक नामे- अतुल अविनाश हिवाळे यांचा खातेक्रमांक 60257278829 यावर रक्कम रुपये 26700/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

ऐ.डी.सी.सी. मार्केट यार्ड शाखा शेवगाव बँकेतील खातेधारक नाव राहुल भगवान निकाळजे यांचा खातेक्रमांक 8077 यावर रक्कम रुपये 24465/- इतकीन बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.भाऊसाहेब साहेबराव भोसले यांचा खातेक्रमांक 18026 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली आली. ऐ.डी.सी.सी. शाखा देवगाव बँकेतील खातेधारक नावे अशोक सुर्यभान जाधव यांचा खातेक्रमांक 2637 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

ऐ. डी. सी. सी. टाऊन शाखा कुकाणा बँकेतील खातेधारक नावे- विठठल रामभाऊ कोलते यांचा खातेक्रमांक 451 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. चंद्रभान नाना हिवाळे यांचा खातेक्रमांक 3129 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. विकास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8099 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.विश्वास चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 8103 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. अलका चंद्रभान हिवाळे यांचा खातेक्रमांक 3414 यावर रक्कम रुपये 24465/- इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली असे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावेडी अहमदनगर बँकेतील खातेधारक नावे-हर्षदा अनिल गायकवाड यांचा खातेक्रमांक 68022669119 यावर रक्कम रुपये 225751/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आलीं. अनिल नारायण गायकवाड यांचा खातेक्रमांक 60291056101 यावर रक्कम रुपये 224512/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेवगाव बँकेतील खातेधारक नावे-नानासाहेब लक्ष्मण घुले यांचा खातेक्रमांक 60348507360 यावर रक्कम रुपये 217412/ इतकी बेकायदेशीरपणे वळवण्यात आली.

अशा प्रकारे तालुक्यातील देडगावचे लाभार्थी शेतकर्‍यांचे एकुण 108820 रकमेचे एकुण 09 धनादेश मध्ये खाडाखोड करुन व बँकेचे नाव बदलुन रक्कमे मध्ये छेडछाड करुन व आमचे कार्यालयाचा बनावट शिक्का व खोटी सही करुन शासनाचे निधीतील एकुण रक्कम रुपये 1614784/- रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन संबंधित कोतवाल अविनाश हिवाळेे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या