Type to search

आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

INDvsAUS: ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय

Share
सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली असून कोहली ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आहे. तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा पराक्रम केला आहे.
कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला आणि भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

सिडनी कसोटीतील पहिल्या डावत केलेल्या १९३ धावांच्या खेळीसाठी पुजराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुजाराने या मालिकेत तीन शतके ठोकून मालिकेतील भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळे मालिका विजयाचाही पुरस्कार त्यालाच देण्यात आला.

भारताने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत मेलबर्न आणि ॲडलेड कसोटीत विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेयिलाने पर्थ कसोटी जिंकली आहे. तर सिडनी कसोटी अनिर्णित राहीली. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या मातीत त्यांनाच लोळवत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला.

भारताने चार सामन्याची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने ऑस्ट्रेयिलात १९४७ पासून ११ कसोटी मालिका खेळल्या आहेत त्यातील ८ कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. तर ३ कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!