IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाची दमदार कामगिरी, लाबूशेनचं दमदार शतक

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिला दिवस संपला त्यावेळी ५ बाद २७४ धावा एवढी मजल मारली होती. मार्नस लबुशेनने शतक झळकावले. तो १०८ धावा करुन बाद झाला. आता कॅमरॉन ग्रीन (२८ धावा) आणि कर्णधार तसेच यष्टीरक्षक असलेला टिम पेन ३८ धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या सलामीवीरांनी तो निर्णय चुकीचा ठरवल. डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडी यजमानांचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्मिथ ३६ धावांवर बाद झाला. पण लाबूशेनने मॅथ्यू वेडच्या साथीने डाव दोनशेपार पोहोचवला.

मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक करता आले नाही. ४५ धावांवर तो माघारी परतला. त्याने सहा चौकार ठोकले. त्यानंतर मार्नस लाबूशेनने आपलं दमदार शतक पूर्ण केलं. आधीच्या सामन्यांमध्ये त्याला शतक करता आलेलं नव्हतं, पण या सामन्यात त्याने शतक झळकावलं. शतक पूर्ण झाल्यावर फटकेबाजी करताना तो १०८ धावांवर झेलबाद झाला. लाबूशेनने २०४ चेंडू खेळत ९ चौकार खेचले. त्यानंतर कर्णधार टीम पेन आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला. ग्रीन २८ तर पेन ३८ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून नटराजनने दोन तर सिराज, सैनी आणि सुंदरने १-१ बळी टिपला. नवदीप सैनी स्वत:चे ८वे षटक टाकत होता. षटकाचा अखेरचा चेंडू टाकताना नवदीप सैनीच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याने गोलंदाजी थांबवली. प्रथमोपचार घेऊन तो मैदानात काही काळ क्षेत्ररक्षण करत होता. पण वेदना असह्य झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. तेथून तो हॉस्पिटलला रवाना झाला. त्याला दुखापतीनंतर स्कॅनसाठी नेण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *