Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आहार शिजविण्याच्या दरात वाढ

Share

संगमनेर (वार्ताहर)– बचत गटांना अन्न शिजविण्यासाठी प्रतिविद्यार्थी मिळणार्‍या रकमेत 3.9 टक्के वाढ लागू करण्यात आली आहे. 19 जुलै 2019 रोजी नवीन आदेश निर्गमित करत प्रतिदिन प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्यामागे 2.48रु पये, तर उच्च प्राथमिकसाठी 6.71 रुपये दर निश्चित केला आहे. इंधन खर्चातही 14 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत 1 ते 5 व्या वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच 6 ते 8 वीतील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिल्या जात आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गाकरिता 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गाकरिता 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. परंतु, आहार शिजविण्यासाठी कमी दर असल्याने तो वाढविण्यात यावा अशी मागणी बचत गटांनी केली होती.

केंद्र शासनाने 2016 च्या आदेशानुसार सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी सन 2015-16 च्या अन्न शिजविण्याच्या दरात 7 टक्के वाढ केली होती. शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीची प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (1 ते 5 वी) 4 रूपये 13 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी (6 ते 8 वी) 6 रूपये 18 पैसेप्रमाणे निश्चित करण्यात आले होते. केंद्र शासनाने 15 नोव्हेंबर 2018 च्या आदेशानुसार सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता सन 2016-17 च्या अन्न शिजविण्याच्या दरात 5.35 टक्के दरवाढ (पान 10 वर)

मंजूर केली होती. 5 फेब्रुवारी 2019 मध्ये हे दर वाढविण्यात आले होते. आता 2018-19 च्या अन्न शिजविण्याच्या दरात 3.09 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीची प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (1 ते 5 वी) 4 रूपये 48 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी (6 ते 8 वी) 6 रूपये 71 पैसेप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील आहार खर्चाची विभागणी करण्यात आली आहे.

त्यानुसार पहिली ते पाचवी लाभार्थीसाठी आहार खर्च 4.48 रूपये, धान्य माल पुरविण्याचा खर्च 2.82 रूपये आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च 1.66 रूपये.
सहावी ते आठवी लाभार्थीसाठी आहार खर्च 6.71 रूपये, धान्य माल पुरविण्याचा खर्च 4.22 रूपये आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च 2.49 रूपये देण्यात येणार आहे.

शहरी भागातील आहार खर्चाची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवी लाभार्थीसाठी आहार खर्च 4.48 रूपये, धान्य माल पुरविण्याचा खर्च 4.48 रूपये आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च 1.66 रूपये.
सहावी ते आठवी लाभार्थीसाठी आहार खर्च 6.71 रूपये, धान्य माल पुरविण्याचा खर्च 4.22 रूपये आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च 6.71 रूपये देण्यात येणार आहे. सदरची रक्कम फेब्रुवारी महिन्यापासून देय करण्यात आली आहे. फरकारची रक्कम संबंधित शाळांना आता करावयाची आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!