आयटीआर फॉर्मसाठी आता ‘सीए’कडे जाण्याची गरज नाही; आयकर विभाग स्वतःच भरणार फॉर्म

0
देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | आता आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नाही वा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. आता आयकर विभाग स्वत: तुमचा फॉर्म भरणार असून तुम्हाला केवळ त्यावर ग्राहकाची सही करावी लागणार आहे. आयकर विभाग आपला आयटीआर फॉर्म भरून ग्राहकाला पाठवणार त्यानंतर सही करून हा फॉर्म आपल्याला जमा करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आयटीआर रिटर्न भरल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

अनेकदा आयटीआर फॉर्म भरण्यासाठी लेखापाल मंडळी टक्केवारी तसेच ठराविक रक्कम ग्राहकाकडून घेते. आता यावर चाप लागणार असून ग्राहकांच्या सोयीसाठी ही सेवा देण्याचे सांगितले जात आहे.

आधी आपण भरलेल्या आयटीआर फॉर्म एम्प्लायार आणि बँकेतून आणलेली माहिती आयकर फाईल करण्यासाठी मदत करतील. केंद्रीय आयकर बोर्डाचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी सांगितले की, आयटी रिटर्न्स गतीने भरण्यासाठी काम सुरु आहे. प्री-फाईल्ड आयकर टॅक्स रिटर्न दाखल केले जाऊ शकतात. यावर फक्त ग्राहकाच्या सहीची आवश्यकता आहे.  जर या फॉर्मवर काही बदल करावयाचे असतील तर तेही करता येणार आहेत.

जे ग्राहक आयटीआर फॉर्म भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी आयकर विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २०१७-१८ सालचे आयटी रिटर्न्स ग्राहक मार्च २०१९ पर्यंत भरू शकणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*