Breaking : ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार

0
नवी दिल्ली : मोदी सरकार येत्या फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणूक असल्याने अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये केंद्र सरकार आयकर सवलतीची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढविणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

नोकरदार वर्गाचं पाच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याच्या हालचाली केंद्राने सुरू केल्या आहेत. सध्याच्या कर रचनेत २.५० लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. तित वाढ करून आयकरासाठीची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरू केलाजाण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे मध्यम वर्गातील नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशात जनतेला खूश करण्यासाठी केंद्राकडून नव्या घोषणा केल्या जाऊ शकतात. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष कराच्या अनुरूप कर रचनेची सध्याची स्थिती बदलण्यासाठीची योजना तयार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*