‘वोक्हार्ट’च्या वॉक फिट झोनचे उद्घाटन

0
नाशिक । जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधत वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे फिटनेसप्रेमींसाठी ‘वॉक फिट झोन’चा शुभारंभ नुकताच झाला. ‘रॅम’ विजेते डॉ. महेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, क्रीडापटू संजीवनी जाधव, विजयेंद्र सिंग यांच्या सोबत वोक्हार्टचे हृदयरोगतज्ञ डॉ. आशुतोष साहू आणि डॉ. आनंद पारेख यांची यावेळी उपस्थिती होती.

आपण स्वस्थ राहावे असे प्रत्येकालाच वाटते. त्यापैकी बरेच जण धावणे, व्यायाम, सायकलिंग, संतुलित आहार यांसारखे मार्ग अवलंबतात. पण तत्सम मार्ग आपल्या शरीराला कितपत अनुकूल आहेत याबद्दल अनभिज्ञनता असते. त्यामुळे फिट राहण्याच्या कसरतीत अनेकांना चुकीच्या व्यायामाचा त्रास होतो आणि प्रसंगी त्याच्या जीवावर बेतते. यासाठीच ‘वॉक फिट झोन’मध्ये योग्य मार्गदर्शनाची सोय केली आहे, अशी माहिती वोक्हार्टचे केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर यांनी यावेळी दिली.

प्रांरभी डॉ. साहू व डॉ. पारेख यांनी स्वस्थ हृदयाकरिता आदर्श जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर करण डान्स इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली झुम्बा तसेच बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करून घेण्यात आली.

LEAVE A REPLY

*