सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी उद्घाटन

0
नाशिक । नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व स्टार क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफीचे उद्घाटन ( दि 13) रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे चित्रा भालेकर यांच्या हस्ते व डॉ. प्रशांत भालेकर, तरुण गुप्ता, चंद्रशेखर दंदणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

यावेळी भालेकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात येऊन व खेळाडूंशी ओळख करत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धांमधील चांगली कामगिरी करणारे खेळाडू व आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करणारे खेळाडू यांच्यातील 200 खेळाडूंची निवड करत त्यांच्यामध्ये 16 संघ तयार करून चांगल्या खेळाडूची निवड करण्याच्या दृष्टिकोनातून कै. सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्टार क्रिकेट क्लब, नाशिक रोड यांच्या सहकार्याने दरवर्षी केले जाते.

स्पर्धेचे हे चौथे वर्षे आहे. यावर्षी स्पर्धेतील प्रत्येक संघास असोसिएशनचे माजी दिवंगत पदाधिकारी, खेळाडू यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघास प्रशिक्षक देण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 ते 16 नोव्हेंबर लीग व 21 रोजी उपांत्य सामने तर अंतिम सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान आजच्या सकाळ सत्रात झालेल्या सामन्यात चंदा शिंदे इलेव्हन संघाने व्ही. पी. बागुल संघावर 9 गडी राखून विजय मिळवला.

दुसर्‍या सामन्यात अविनाश आघारकर इलेव्हन संघाने अशोककुमार पाटील इलेव्हन संघावर 34 धावांनी विजय मिळवला. तिसर्‍या सामन्यात भाई वडके इलेव्हन संघाने सुधाकर भालेकर इलेव्हन संघावर 18 धावांनी विजय मिळवला. दुपार सत्रातील सामन्यांमध्ये दादू कटारे इलेव्हन संघाने विजय भोर इलेव्हन वर 42 धावांनी विजय मिळवला.

चंदा शिंदे इलेव्हनने आपल्या दुसर्‍या सामन्यातही सुधाकर भालेकर इलेव्हन संघावर 41 धावांवर विजय मिळवला. भाई वडके इलेव्हन संघाने आपल्या दुसर्‍या सामन्यात अटीतटीच्या लढतीत व्ही. पी. बागुल इलेव्हन संघावर 5 धावांनी विजय मिळवला.

LEAVE A REPLY

*