नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

नंदुरबार – 

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांमधील वेगवेगळ्या कला गुणांचा अविष्कार होईल, त्यांचा विकास होईल व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वंयसेवी संस्थांमधील बालके व शहरातील विविध शाळांमधील मुले यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे चाचा नेहरु बालमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत  होते.

कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, बळवंत निकुंभ, बाल कल्याण समिती सदस्य मधुकर देसले, नितीन सनेर, सदस्या श्रीमती सीमा सुर्यवंशी, दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाचे अध्यक्षा वंदना तोरवणे, काठोबा देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास राठोड, श्रीयाद मुलींचे बालगृह अध्यक्ष डी. एस. बच्छाव, रुख्माबाई मुलींचे बालगृह सोरापाडाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निर्मल मुलींचे बालगृहाचे अध्यक्ष विवेक पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड  यावेळी म्हणाले, विविध बाल सुधारगृहातील बालकांची मानसिकता कमी नसावी, तेही सर्वसाधारण मुलांसोबत विविध स्पर्धेमध्ये सहभागी होवू शकतील, त्यामधून त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवून इतर मुलांप्रमाणे त्यांचाही चांगला विकास व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  या स्पर्धांमध्ये सर्व मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी प्रास्ताविकात सांगितले, चाचा नेहरु बाल महोत्सवात एकूण 82 संस्था व शाळांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात सांघिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व वैयक्तीक खेळ घेण्यात येत आहेत. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकूण 128 मुले व 246 मुली सहभागी झाल्या आहेत. 15 ते 18 वयोगटातील एकूण 108 मुले व 124 मुली सहभागी झाल्या आहेत असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. उमेश शिंदे यांनी केले. आभार जिल्हा परिविक्षाधिन अधिकारी जी.ए.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाचे जिल्हा संरक्षण अधिकारी भरत राणे, परिविक्षाधिन अधिकारी दिनेश लांडगे, विधी सल्लागार एस.डी. वळवी यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com