नाशकात साडेचार महिन्यात स्वाईन फ्लूचे 33 रूग्ण दगावले

0
नाशिक । जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वाईन फ्लूचा प्रभाव दिसून आला आहे. जिल्हा रूग्णालयात 4 स्वाईन फ्लू रूग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मागील साडेचार महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लू बळींची संख्या 33 वर पोहचली आहे. तर मागील 9 वर्षात जिल्ह्यात एकुण 236 स्वाईन फ्लूचे बळी गेले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वाईन फ्लू कक्षामध्ये दररोज सरासरी 4 शहरातील तसेच ग्रामिण भागातील रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 15 दिवसात जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू बळींची संख्या 3 तर एकुण जिल्हयातील बळींची संख्या 33 वर पोहचली आहे.

मागील वर्षी याच कालावधी ही संख्या केवळ 4 होती. सर्वाधिक बळी 2015 मध्ये गेले असून ही संख्या 87 इतकी होती. 2011 मध्ये जिल्ह्यात केवळ 1 बळी गेला होता. साधारण एक वर्षानंतर स्वाईनचा प्रभाव वाढत गेल्याचे यावरून दिसून येत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगीतले.

चालूवर्षी बळी गेलेल्यांमध्ये पंचवटी, इंदिरानगर व अंबड, चुंचाळे, ग्रामिण मधील सिन्नर, निफाड, सटाणा, कळवण, मालेगाव, इगतपुरी, नांदगाव येथील रूग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*