Friday, May 3, 2024
Homeनगरघर घर लंगर सेवेच्या अन्नवाटपाचा रक्तदानाने समारोप

घर घर लंगर सेवेच्या अन्नवाटपाचा रक्तदानाने समारोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – घर घर लंगर सेवेतर्फे नगर शहरात साडे सात महिन्यांपासून गरजूंसाठी सुरु असलेल्या अन्न वाटपाचा समारोप रक्तदान शिबिराने करण्यात आला. मात्र, सकाळी युनानी व आयुर्वेदिक काढा वाटपचा उपक्रम व गुरु अर्जुनदेव कोवीड केअर सेंटर सुरूच राहणार असल्याची माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनकल्याण रक्तपिढीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीर घेण्यात आले. लंगरसेवेच्या सेवादारांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. यावेळी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, दामोदर माखिजा, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, नरेंद्र बोठे, सुनील थोरात, डॉ. गुलशन गुप्ता, अ‍ॅड.चंद्रकांत पाटील, अनिश आहुजा आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वसामान्य व गरजू घटकातील नागरिकांची दिवाळी गोड होण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने फराळाचे पॅकेट वाटप केले जाणार आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना नोगरी गमवावी लागली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्यांची दिवाळी गोड होण्यासाठी फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी व सामाजिक संस्थांनी लंगर सेवेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या