Type to search

Featured आवर्जून वाचाच नाशिक

जाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व

Share

नाशिक | गणेश सोनवणे

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रुपांच पुजन केले जाते. या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळ घालण्याची प्रथा वर्षांनुवर्षांपासून चालत आलेली आहे. नवरात्रीचे नऊ रंग हे येणार्‍या वारावर आधारीत असतात. भारतीय ज्योतीषांनी हे नऊ रंग ठरवले आहेत.

2004 साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदीरात देवीला नऊ दिवस नऊ रंगाची साडी नेसवण्यात आली होती. तेव्हापासून ही प्रथा सर्वत्र रुढ झाली आहे.  देवीला त्या-त्या दिवशी येणार्‍या वारानुसार त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जात असते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील प्रांतात ही संकल्पना महिलांनी स्विकारलेली आहे.

त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवस या नऊ रंगाची उधळण सगळीकडे पाहायला मिळते. उगवत्या सुर्याचा रंग केसरी म्हणून रविवारचा रंग केसरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल असतो. बुधवारचा रंग निळा, गुरवारचा रंग पिवळा , शुक्रवारचा हिरवा व शनिवारचा रंग करडा असतो.आता सात दिवसांचा आठवडा संपला की उरतात ती दोन दिवस या दोन दिवसांसाठी मोरपिशी,हिरवा, जांभळा,आकाशी, आणि गुलाबी या रंगाची वापर केला जातो.

या माळा पुढील प्रमाणे-

पहिली माळ 
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ असते.

दुसरी माळ 
अंनत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या फुलांची माळ.

तिसरी माळ 
निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा 

चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले.अबोली,तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ 
कुंकवाची किंवा बेलाची माळ असते.

सहावी माळ 
कर्दळीच्या फुलांची माळ 

सातवी माळ 
नांरगीची किंवा झेंडुची फुले

आठवी माळ 
तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ 
कुंकुमार्चनाची वाहतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!