Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांचे दि. ६ फेब्रुवारीला निधन झाले. शिवाजी पार्क (Shivaji park) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अस्थींचे विसर्जन आज (दि. १०) सकाळी रामकुंड येथे करण्यात आले….

- Advertisement -

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

यावेळी रामकुंड परिसरात लतादीदींच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अस्थी विसर्जनावेळी नाशिककर भावूक झाल्याचे दिसून आले. ज्या नाशिककरांना मुंबईत अंत्यदर्शनाला जाता आले नाही त्यांनी आज सकाळपासून गंगाघाटावर गर्दी केली होती.

याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे आज सकाळपासूनच नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अस्थी विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. रामकुंडावर शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून आले. अस्थींचे विधिवत पूजन करून रामकुंडात या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या