Type to search

Featured नाशिक

हरणबारी उजवा कालवा प्रकल्पाचे काम त्वरित सुरु करा अन्यथा उमेदवारांना प्रचारबंदी

Share

सटाणा | प्रतिनिधी

बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित डावा कालवा सारी क्रमांक आठ हरणबारी उजवा कालवा या प्रकल्पांची कामे सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरू झाली. मात्र निवडणूक संपल्यावर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधी या सर्व प्रकल्पांबाबत योग्य ती दखल घेऊन कामे सुरू झाली नाहीत तर लाभक्षेत्रातील सर्व गावात कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधी किंवा उमेदवाराला प्रचारासाठी बंदी केली जाईल असा इशारा लाभक्षेत्रातील संतप्त शेकडो शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील प्रकल्पांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प आहेत दर पाच वर्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मते मिळविण्यासाठी या कामांना मंजुरी दिली जाते. त्यानंतर काही दिवस काम चालते आणि निवडणुका संपल्या की प्रकल्पाचे काम देखील रखडतील या वर्षी तरी प्रकल्प पूर्ण होईल आणि आपल्या गावात पाणी येईल या अपेक्षेत असलेल्या असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांचा प्रकल्पांच्या नावाने मतांसाठी फक्त वापर केला जात आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत यावेळी प्रकल्पांच्या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू झाले आणि निवडणूक संपल्यावर आज पर्यंत हे सर्व कामे ठप्प झाली आहेत. प्रशासनाकडे विचारणा केली असता पावसाळा सुरू असल्याने कामे बंद असल्याचे कारण दिले जाते. सहा महिन्यांपूर्वी डावा कालवा झिरो ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत मंजूर झाला आणि त्याला निधी सुद्धा प्राप्त झाला डोंगरे जवळ कान्हेरी नदीवर एक कोटी रुपयांची जलवाहिनी मंजूर झाली व निधी प्राप्त झाला मुळाने देवळाने जलवाहिनीच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली त्यासाठी निधी प्राप्त झाला तसेच हरणबारी उजवा कालवा वायगाव पर्यंतच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात झळकल्या मात्र निवडणुकीनंतर हे सर्व कामे ठप्प असल्याने शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सर्वेक्षणाचे काम विधानसभा निवडणुकीची आज पूर्ण करून शासनाचे जलवाहिनीचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाने दिले होते मात्र हे फक्त आश्वासनच राहिले आहे. सभा निवडणुकांच्या आधी या मंजूर प्रकल्पांची कामे सुरु होत नाहीत तोपर्यंत गावात कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधी अथवा उमेदवाराला प्रचारासाठी घुसू दिले जाणार नाही. येत्या आठ दिवसात शासकीय पातळीवरून कामांची स्थिती सुधारली नाही तर लाभ क्षेत्राच्या सर्व गावातील जनता तीव्र आंदोलन करतील असा संतप्त इशाराही निवेदनात दिला आहे.

दरम्यान, नायब तहसीलदार पी एस नेरकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कृती समितीचे नंदकिशोर शेवाळे, नाना मुरकर, लखन पवार, भावसिंग पवार, प्रभाकर पवार, साहेबराव पवार, योगेश पिंपळसे, दीपक ढोके, राजेंद्र रौंदळ, सुनील रौंदळ, अनिल रौंदळ, महेश रौंदळ, राजधर नेरकर, नंदकिशोर नेरकर, दिनेश भोसले, प्रकाश शेवाळे, धनंजय पवार, भाऊसाहेब शिरसाठ आदींसह लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!