Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इमिटेशन ज्युएलरीचा ‘साज’ आता खरेदी करा ऑनलाईन; टकले ज्युएलर्सचा व्यावसायिक विस्तार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सराफी सुवर्ण पेढीची तब्बल ८९ वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या टकले ज्युएलर्सने बदलत्या काळाची पाऊल ओळखून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. नव्या पिढीची दागिन्यांची आवड आणि कल लक्षात घेत इमिटेशन ज्युएलरीची विस्तृत आणि कलापूर्ण, सुबक रेंज असलेले ‘साज’ संकेतस्थळ (वेबसाईट) ग्राहकांच्या सेवेत नुकतेच रुजू झाले.

विश्‍वास आणि खरेपणा याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या टकले ज्युएलर्सची मुहूर्तमेढ सन १९३० साली वामनराव टकले यांनी नाशिकमधील सराफ बाजारात रोवली. तेव्हापासून आजतागायत या पेढीने शुद्धता आणि विश्‍वासाच्या जोरावर ग्राहकांना आपलेसे करत सुवर्ण अंलकारासाठी भरवशाचे, हक्काचे सुवर्ण दालन दिले.

दरम्यान, सन १९६८चा गोल्ड कन्ट्रोल कायदा, त्यानंतर १९७५ मध्ये देशभर लादण्यात आलेली आणीबाणी यासारखी आव्हाने तसेच सराफी व्यवसायातील चढ-उतार, स्थित्यंतरे लिलया पेलत या पेढीने प्रगतीचा आलेख सतत उंचवात ठेवला.

आज नव्या पिढीच्या गरजा, पसंत ओळखून टकले ज्युएलर्सने ई-कॉमर्स अर्थात ऑनलाईन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. हल्ली नववर्गातील युवतींमध्ये दागिने खरेदीचा प्रकार बदलला असला तरी त्यांची दागिने खरेदीचे अप्रुप आणि उत्सुकता कायम आहे. तरुणींना फॅशनेबल दागिने आवडतात. ‘दागिने शुद्ध सोन्याचेच हवेत; खोटे आम्ही वापरत नाही बाई’ असे पूवी ऐकण्यात येणारे संंवाद केव्हाच मागे पडले आणि स्वस्तात सहज वापरता येणार्‍या कलात्मक इमिटेशन दागिन्यांची पद्धती सर्वत्र रुजली आहे.

या नवीन पिढीतील युवतींच्या, महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘साज’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून टकले ज्युएलर्स सज्ज झाले आहेत. स्वस्त तितकेच मस्त; बाळगायला सोपे आणि फॅशनसह परंपराच्या मिश्रणाचा हा नवीन ‘साज’ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये अत्यंत सुबक, कलात्मक दागिन्यांचा विस्तृत श्रेणी विक्रीस उपलब्ध असून त्यांचे दरही परवडणारे आहेत.

तेव्हा टकले ज्युएलर्सचा हा नवीनतेचा ‘साज’ एकदा ल्यायलाच हवा….! ‘साज’च्या www.saaj.design या वेबसाईटवर क्लिक करा इमिटेशन ज्युएलरीचा ‘साज’ आता खरेदी करा ऑनलाईन.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!