#IMEI : आयएमईआय नंबरशी छेडछाड केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास

0

मोबाईलच्या आयएमईआय (आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख) नंबरशी छेडछाड केली तर तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो. मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. आयएमईआय हा मोबाईलची ओळख असणारा 15 अंकी नंबर असतो.

दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. यामुळे आयएमईआय संबंधित समस्यांवर तोडगा काढणं आणि हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शक्य होणं अपेक्षित आहे. आयएमईआय नंबरशी छेडछाड करणं हा गुन्हा असल्याचं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे.

इंडियन टेलीग्राफच्या कलम 7 आणि कलम 25 अन्वये यासाठी एक नवीन नियमही तयार करण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर त्यावरील सेवा बंद करण्यासाठी दूरसंचार विभाग एक नवीन प्रणाली लागू करणार आहे. आयएमईआय नंबर बदलला किंवा सिम काढल्यानंतरही या प्रणालीमुळे इतरांना मोबाईल वापरता येणार नाही.

LEAVE A REPLY

*