भारतीय हवामान खात्याच्या वार्तापत्रात पाकव्याप्त काश्मीरच्या भागांचा उल्लेख; पाकड्यांचा जळफळाट

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

नवी दिल्ली – पाकव्याप्त काश्मीरातील मुजफ्फराबाद, गिलगिट, बल्टिस्तान हा भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा भारताचा आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील सर्वांत मोठी हवामानविषयक संस्था असलेल्या भारतीय हवामान खात्याने आपल्या नकाशावर मुजफ्फराबाद, गिलगिट, बल्टिस्तान या जागांचा स्वतंत्र उल्लेख सुरु केला आहे यामुळे मात्र पाकड्यांचा चांगलाच जळफळाट  झाला आहे.

हवामान खात्याने शुकवारच्या आपल्या वार्तापत्रात गुलाम काश्मीरचा स्पष्ट उल्लेख सुरू केला. गुलाम काश्मीर यामध्ये मुझफ्फराबाद तर गिलगिट-बाल्टिस्तान या भागांचा स्वतंत्र उल्लेख हवामान खात्याने केला आहे. पाकिस्तानने यावर तीव आक्षेप घेत, भारताचे हे पाऊल बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. भारताने याआधीही असे नकाशे आणण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही या देशाने केली आहे.
काश्मीर खोर्‍याचा अंदाज देताना भारतीय हवामान खाते आधी जम्मू-काश्मीर असाच उल्लेख करीत असे, पण आता जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, गिलगिट-बल्टिस्तान असा तपशीलवार उल्लेख सुरू झाला. मुझफ्फराबाद हे गुलाम काश्मीरमध्ये येते, तर गिलगिट-बल्टिस्तान हा भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा भारताचा आरोप आहे.

कलम 370 निष्प्रभ करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निमिती करण्यात आली आहे. तेव्हापासूनच गुलाम काश्मीरचा उल्लेख आम्ही करीत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. आधी हा उल्लेख प्रादेशिक हवामान वृत्तात यायचा. आता उत्तर-पश्चिम हवामान झोनमध्येही त्यांचा स्वतंत्र उल्लेख सुरू केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रोज प्राईम टाईममध्ये हवामानविषयक वार्तापत्र जारी केले जाते.

आता लवकरच खाजगी वृत्तवाहिन्याही आपल्या हवामानविषयक वार्तापत्रांमध्ये गुलाम काश्मीरचा उल्लेख करतील, अशी माहिती सूचना व प्रसारण मंत्रालयाने दिली. संपूर्ण दक्षिण आशियातील एक महत्त्वाची हवामान विषयक संस्था म्हणून भारतीय हवामान विभागाची ओळख आहे. याआधीही फक्त भारतातच नव्हे तर, शेजारील राष्ट्रांनाही वादळ-पावसाचे अंदाज हवामान खात्याने वर्तविले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *