Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

डॉक्टरांवरील हल्ले थांबवा : इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

Share

नाशिक | प्रतिनिधी

डॉक्टरांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज (इंडियन मेडिकल असोसिएशन) आयएमएच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील आयएमएच्या सदस्यीय डॉक्टरांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली.

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल येथे डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेत डॉक्टर अत्यव्यस्थ अवस्थेत डॉक्टराची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

अलीकडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या  पार्श्वभूमीवर आज २४ तास देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संपादरम्यान बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद आहे. ऑपरेशन किंवा नवीन रुग्ण दाखल करून घेण्यात येणार नाहीत.

डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्यात यावा अशी मागणी आयएमएकडून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना पाठविण्यात आल्याचे आयएमएकडून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

आयएमएच्या आंदोलनाला होपचा पाठिंबा

कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर यावेळी देखील सोमवार दिनांक १७ जून रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून देशभरात सर्व डॉक्टर या दिवशी काळ्या फिती लावून काम करतील तसेच जागोजागी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला होप फाउंडेशनकडूनही पाठिंबा देण्यात आला असून सोमवारी सकाळी ११ वाजता या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!