Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

चांदगाव परिसरात अवैध वृक्षतोड; वनविभाग सुस्त

Share

मुकुंद आहिरे | चांदगाव

चांदगाव परीसरात गेल्या काही दिवसांपासून वूक्षाची बेसुमार कत्तल केली जात आहे. वन विभागाचे अधिकारी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.

तालुक्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता अधिका जाणवत आहे. कमी पाऊस पडल्याने शेतकर्यांचा खरीप व रब्बी दोन्ही हंगाम हातचे गेले आहेत. कुठल्याही प्रकारचे हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे.

पावसाळ्याची पुर्वतयारी म्हणून अनेकांनी छप्परासाठी तर सरपणसाठी अनेकांनी बेकायदा वृक्षतोड केलेली दिसून येत आहे. वनविभागाने या परिसरात फेरफटका मारण्याची गरज असून वनसंपत्तीचा ऱ्हास झाला तर येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.

वन विभागाकडून तसेच अनेक सामाजिक संस्थांकडून पावसाळ्यात वृक्षलागवड हाती घेण्यात येते मात्र, देखभाल नसल्यामुळे झाडे जगत नाहीत. त्यामुळे वृक्षालागवड धोरण प्रभावीपणे राबवत वृक्षांच्या देखभालीसाठीही कुठेतरी प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी परिसरातून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!