अवैध वाळू उपसा केल्यास पाचपट दंड

0

अधिकार्‍यांच्या दंडाची रक्कम कमी-अधिक करण्याचा अधिकार संपुष्टात

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याच्या विविध भागात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातल्याने अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सरकारने उपाय योजले आहेत. यापुढे आता अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांना बाजारमुल्याच्या पाच पटीपर्यंत दंडाची रक्कम आकारण्याची तरतुद करण्यात आली आहे.
याबाबतचे दिशादर्शक निर्देश महसूल विभागाने क्षेत्रीय अधिकार्‍यांना जारी केले आहेत. अधिकार्‍यांच्या दंडाची रक्कम कमी-अधिक करण्याचा अधिकार संपुष्टात आणण्यात आला आहे. त्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. एखाद्या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन दिसून आल्यानंतर तेथे थेट कारवाई करून छाप्यानंतर अवैध गौण खनिजाची विल्हेवाट लावताना जप्त करण्यात आलेली यंत्रसामग्री सोडविण्याकरिता भविष्यात अवैध व्यवसाय पकडण्यात आलेल्या यंत्रसामग्रीचा वापर होणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे
वाणिज्यिक प्रयोजन तथा विक्री करण्यासाठी वाळू व अन्य गौण खनिजाचे अवूध उपसा व वाहतूक करणे, तसेच उत्खननास परवानगी गदिलेल्या क्षेत्राबाहेर कुणी उपसा केल्यास त्यास बाजारमुल्याच्या पाचपट दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे.
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक ग्रामस्थांकडून स्वतःच्या वापरासाठी तीन ब्रासपर्यंतच मर्यादेत करण्यात आली असल्यास अशा प्रकरणांत पहिल्या वेळेस गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या एकपट दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे. दुसर्‍या वेळेस तसे आढळून आल्यास गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या तीनपट आणि तिसर्‍या वेळेस व त्यापुढील प्रत्येक वेळेस तसे आढळल्यास गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे. कोणत्याही वेळी असे अवैध उत्खनन व वाहतूक 3 ब्रासपेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्यास तीन ब्रासवरील गौण खनिजासाठी बाजारमुल्याच्या पाचपट शास्तीची रक्कम आकारण्यात येईल.
मंजूरी दिलेल्या परिणामापेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करण्याच्या प्रकरणात मंजुरीपेक्षा जास्त उत्खनन केलेल्या गौण खनिजासाठी पहिल्यावेळेस बाजारमुल्याच्या तीनपट शास्तीची रक्कम आकारण्यात येणार आहे. तीच व्यक्ती अशाप्रकारे वाढीव उत्खनन करताना दुसर्‍या वेळेस व त्यापुढील प्रत्येकवेळी आढळून आल्यास अशा वाढीव उत्खननासाठी गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट शास्ती आकारण्यात येणार आहे.

वाहतूक पास, खाडाखोड करणे महागात पडणार वाहतूक पास, खाडाखोड करणे महागात पडणार गौण खनिज उत्खननास मंजूरीआहे पण वाहनासाबत वाहतूक पास नसणे किंवा वाहतूक पासमधील गौण खनिजाच्या परिणामापेक्षा अधिक वाळूची वाहतूक रकणे, वाहतूक पासमध्ये खाडाखोड करणे अशा प्रकरणांत पहिल्या वेळेस गोैण खनिजाच्या बाजारमुल्याच्या तीनपट तसेच दुसर्‍या वेळेस व त्यानंतरही असे करताना आढळून आल्यास पाचपट शास्तीची रक्कम भरावी लागणार आहे.

1 जानेवारीला भाव होणार निश्‍चित
अवैध उपसा व वाहतूक करण्यात आलेल्या गौण खनिजाच्या बाजारभावाच्या आधारे दंड आकारण्यासाठी जिल्हधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गौण खनिजाचे बाजारभाव निश्‍चित करावे व त्यानुसार संबंधीत गौण खनिजाच्या दंडाची रक्कम निश्‍चित करावी. दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीस देऊन त्यांची बाजू ऐकून घेऊन कायद्यातील तरतुदींनुसार स्पष्ट आदेश पारीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तीन खात्यांचे एकत्रित पथक
यापूर्वी महसूल अथवा पोलिस वेगवेग़ळे छापे टाकून वाळूतस्करांवर कारवाई करीत होते. पण यापुढे आता महसूल, पोलिस आणि परिवहन अधिकारी यांचे एकत्रित पथक राहिल व ते यासंदर्भात कार्यवाही करतील. अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनांंचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीआकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

परवान्याचे अधिकार कुणाला?
तहसीलदार : 500 ब्रासपर्यंत
प्रातांधिकारीः 500 ते 2000 ब्रासपर्यंत
जिल्हाधिकारी : 2001 ते 25000 ब्रासपर्यंत

1 जानेवारीला भाव होणार निश्‍चित
अवैध उपसा व वाहतूक करण्यात आलेल्या गौण खनिजाच्या बाजारभावाच्या आधारे दंड आकारण्यासाठी जिल्हधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गौण खनिजाचे बाजारभाव निश्‍चित करावे व त्यानुसार संबंधीत गौण खनिजाच्या दंडाची रक्कम निश्‍चित करावी. दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीस देऊन त्यांची बाजू ऐकून घेऊन कायद्यातील तरतुदींनुसार स्पष्ट आदेश पारीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

… तर दंड!
वाहतूक पासमध्ये दिलेली वाहतुकीची वेळ संपल्यानंतर वाळू व अन्य गौण खनिजाची वाहतूक करताना आढळून आल्यास पहिल्यावेळीस दोनपट तर दुसर्‍या व त्यापुढेही असे करताना आढळल्यास तीनपट दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*