Friday, May 3, 2024
Homeनगरगॅसच्या पाईपलाईनसाठी नगर-मनमाड महामार्गावर झाडांची बेकायदा कत्तल

गॅसच्या पाईपलाईनसाठी नगर-मनमाड महामार्गावर झाडांची बेकायदा कत्तल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गावरून (Nagar-Manmad Highway) टाकण्यात येणार्‍या गॅसच्या पाईपलाईनसाठी (Gas Pipeline) महामार्गालगतच्या मोठ्या झाडांची खुलेआम बेकायदा कत्तल (Illegal Cutting of Trees) होत असल्याने वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त (Express Anger) केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, बेकायदा वृक्षतोड (Illegal Cutting of Trees) करणार्‍या ठेकेदारावर कारवाई (Contractor Demand) करण्याची मागणी करण्यात आली असून वृक्षांची कत्तल थांबवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा (Hint Movement) वृक्षप्रेमींनी दिला आहे.

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

गेल्या सहा महिन्यांपासून नगर-मनमाड महामार्गावरून (Nagar-Manmad Highway) कोल्हारच्या (Kolhar) दिशेकडून संबंधित ठेकेदाराने गॅसची पाईपलाईन (Gas pipeline) टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी महामार्गाच्या लगतचा रस्ता खोदाईही सुरू आहे. तर पाईपलाईन (Pipeline) टाकण्याच्या कामात आडवे येणारे वृक्ष बेकायदा तोडण्यात येत आहेत. त्यावर अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष (Ignore) झाले आहे.

ही झाडे वनखाते किंवा सामाजिक वनीकरण खात्याच्या अधिकारात येतात का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Department of Public Works) अधिकारीही दुर्लक्ष (Ignore) करीत आहेत. या पाईपलाईनसाठी महामार्गावरील मोठी झाडे, नुकतीच लावण्यात आलेली झाडेही तोडण्यात येत आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या