अवैध दारु विक्री : 56 ठिकाणी छापेे

0

4 लाख रुपयांचा माल जप्त, 49 जणांना अटक, 34 वर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)– महामार्गावरील दारु विक्रीचा बंदी निर्णय झाल्यानंतर ग्रामीण भागात गावो-गावी अवैध दारू विक्रीला पेव फुटले आहे. ग्रामीण भागात चारू चढ्या दराने दारू विक्री करणार्‍यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई सत्र हाती घेतले आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेशनने जिल्ह्यात तब्बल 56 ठिकाणी छापा टाकले. या छाप्यात 4 लाख 6 हजार 208 रुपयांचा माल जप्त करत 49 जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा व अप्पर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील, रोहिदास पवार यांच्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शाखने पोलिस निरीक्षक दिलीप पवार व 25 पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकार्‍यांनी विदेशी, देशी व गावठी हातभट्टीची दारु पकडली. ही दारु ताब्यात घेवून मुंबई प्रोव्हिशन अ‍ॅक्टनूसार गुन्हे दाखल करुन 49 जणांना अटक करण्यात आली आहे.
राहुरीत शकंर रमेश गोचानी, अशोक भगवान काळे, गोरख कारभारी साठे, दिलीप रेवजी हापसे यांच्याकडून 7 हजार 464 रुपयांची देशी व विदेशी, नेवासात लक्ष्मीबाई अशोक पिंपळे यांच्याकडून 14 हजार रुपयांचे कच्चे रसायण व गावठी हातभट्टी, सतिष व्यकंट आरेटी 19 हजार 968 रुपयांची देशी व विदेशी दारु. भिंगार कॅम्पच्या हद्दीत राजेंद्र शंकर गाढवे (कवडगाव) 1 हजार 248 रुपयांची देशी दारु पकडली. कोतवालीच्या हद्दीत दत्तात्रय बाबासाहेब जाधव 832 रुपयांची देशी, जावेद गुलाब शेख 1 लाख 57 हजार 480 रुपयांची देशी व विदेशी दारु. पारनेरच्या हद्दीत गोरक्ष दत्तात्रय जर्‍हाड 2 हजार रुपयांची देशी व विदेशी दारु.
कर्जतमध्ये भाऊसाहेब बाळासाहेब शेंडकर 2 लाख 24 हजार रुपयांची विदेशी दारु, चंद्रकांत बाबु पडवळ 15 हजार 710 रुपयांची देशी व विदेशी दारु, राणी बन्सी पवार 400 रुपयांची गावठी हातभट्टी, शकील मुक्कबल पठाण 500 रुपयांची देशी दारु. श्रीगोंद्यात वर्षा रमेश गुंजाळ, पनाबाई अण्णा काळे, आशाबाई राजेंद्र गोरे, सागर भारत घोडके यांच्याकडून एकूण 63 हजार रुपयांची देशी व विदेशी दारु जप्त. बेलवंडीत बाळासाहेब मोहन जगधने, चंदू दत्तात्रय गिरे, सचिन चंद्रकांत थोरात 2 हजार रुपये किंमतींची देशी व हातभट्टी दारु. शेवगावमध्ये अरुण बेंझामिन मगर 772 रुपयांची देशी, महादेव निवृत्ती पानाईन 312 रुपयांची देशी, प्रकाश बाळासाहेब धोरतळे 364 रुपयांची देशी. श्रीरामपुरला राहुल विठ्ठल धायगुडे, राहुल ज्ञानदेव गोटे, मोहन गंगाराम शिंदे, राहुल काळे, मज्जाबाई दाविद गायकवाड, मेहबूब बाबुभाई शेख यांच्याकडून 11 हजार 541 रुपयांची देशी, विदेशी व हातभट्टी दारु, श्रीरामपूर शहर – सुनिल नारायण सपकाळ 19 हजार 485 रुपयांची देशी व विदेशी दारु, लक्ष्मण कुमेरसिंग काळे 450 रुपयांची देशी व संजय जन्नार्धन नरवडे 400 रुपयांची हातभट्ठी.
राहात्यामध्ये संजय दामू मोरे अठराशे रुपयांची हातभट्टी, लोणीमध्ये राजेंद्र तुकाराम लांडे 2288 रुपयांची देशी. शिर्डीत विलास नारायण लोणारे, अलका भाऊसाहेब बर्डे 4 हजार 160 रुपयांची देशी व विदेशी. सुप्यात सोमनाथ मधुकर पवार, बबन पांडुरंग कानडजे 6 हजार 610 रुपयांची विदेशी व हातभट्टी. नगर तालुक्यात एकनाथ बाबु पवार, अर्जृन भिमा गव्हाणे 25 हजार 500 रुपयांचे हातभट्टी व तयार रसायण. तोफखाना हद्दीत बॉबी प्रेमचंद कांबळे 400 रुपयांची हातभट्टी. संगमनेरमध्ये अर्चना संजय अडगळे 4 हजार 68ह रुपयांची विदेशी. संगमनेर शहरात संतोष जनू आव्हाड, रवी जानू आव्हाड यांच्याकडून 50 हजार 460 रुपयांची देशी, ताडी दारु.

कोपरगावमध्ये सुरेश साहेबराव हटकर 624 रुपयांची देशी. कोपरगाव शहरात संदिप कैलास शिंदे 500 रुपयांची हातभट्टी, शनिशिंगणापूरमध्ये अर्जृन नयानासिंग अधिकारी 838 रुपयांची देशी व विदेशी. जामखेडमध्ये नंदकुमार बापु खैरे 416 रुपयांची देशी, सतिश नवनाथ पवार 520 रुपयांची देशी. सोनईत दिलीप भिमराज जाधव 572 रुपयांची देशी, प्रदीप राघू शेट्टी 8 हजार 923 रुपांची देशी व विदेशी, भानुदास आण्णा शिंदे 624 रुपयांची देशी, राजूर (अकोले) नारायण शांताराम लहामंगे 832 रुपयांची देशी दारू पोलीसांनी पकडली आहे.

आरोपींमध्ये महिलांचाही समावेश
जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्यात येत आहे. या ठिकाणी पकडण्यात येणार्‍या आरोपींमध्ये अवैध दारु विक्री करणार्‍यामध्ये महिलांचीही लक्षणीय आहे. यामुळे जिल्ह्यात दारूबंदी करतांना अवैध दारू विक्री करणार्‍या पुरूषांसोबत महिलांचे प्रबोधन करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*