Wednesday, April 24, 2024
Homeनगरअवैध व्यवसायांवर सोनई पोलिसांचे छापे

अवैध व्यवसायांवर सोनई पोलिसांचे छापे

घोडेगावात मटका तर चांद्यात हातभट्टी व्यावसायिकांवर कारवाई

सोनई (वार्ताहर)- सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने चांदा येथे हातभट्टी गावठी दारू अड्ड्यावर तसेच घोडेगाव येथे मटका बेटिंग घेणार्‍या टपरीवर छापा टाकून दोन आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल पोपट थोरात यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की घोडेगाव बस स्थानकाजवळ एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला आरोपी फारुख इमामसाब पठाण (वय 47) हा विनापरवाना कल्याण मटका नावाचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिठ्ठ्यावर आकडे लिहून देऊन खेळत व खेळविताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून 520 रुपये रोख रक्कम व कल्याण मटक्याचे आकडे लिहिलेली वही, कार्बन पेपर व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फारूक पठाण राहणार घोडेगाव याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम 12(अ) प्रमाणे 397/2019 क्रमांकाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास तपास पोलीस नाईक शिवाजी माने हे करीत आहेत.

सोनई पोलिसांचे पथकाने चांदा शिवारातील इरिगेशन तळ्याजवळील काटवनात दोन प्लॅस्टिक ड्रममधील एक हजार रुपये किमतीची 20 लिटर हातभट्टीची तयार दारू व दारूसाठीचे 110 लिटर कच्चे रसायन किंमत 2200 रुपये असा मुद्देमाल आरोपी रवींद्र योसेफ आढाव (वय 22) रा. चांदा याच्या कब्जातून नष्ट करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट 65 (फ) (ई) प्रमाणे कॉन्स्टेबल विठ्ठल पोपट थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. दत्तात्रेय गावडे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या