Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार जामखेडमध्ये उघड

Share

डॉक्टर, मेडिकल चालकासह तिघांना पोलीस कोठडी

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून स्री जातीचा गर्भ आसल्याचे माहीत होताच जामखेड येथील मेडिकलमधून बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या घेऊन चार महिन्यांचा गर्भपात केला. या प्रकरणी एकूण सहा जणांना विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे व पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) रा. अकलूज जवळील गाव व दोन महिलांसह गभलिंग निदान करण्यासाठी मदत करणारे इतर डॉक्टर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आरोळे वस्ती येथे एका कुटुंबातील विवाहितेने अकलूज येथील एका गावातील पाटील नावाचा इसम (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडे 31 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून घेतली.

या तपासणीत सदर महिलेच्या पोटात स्रीजातीचा गर्भ असल्याचे सांगितले. या कुटुंबाला मुलगा हवा होता. त्यामुळे तपासणीत स्त्रीजातीचा गर्भ निघाल्याने या कुटुंबाने नंतर चार पाच दिवसांपूर्वी जामखेड येथील एका मेडिकल चालकाशी संपर्क साधून त्याच्याकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी गोळ्या खरेदी केल्या व त्या गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्या नंतरही घरी पूर्ण गर्भपात न झाल्याने त्या महिलेस त्रास होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी जामखेड येथील डॉ. युवराज खराडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तातडीने सदर महिलेस नेमके काय प्रकरण आहे असे विचारले त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी खरा घडलेला प्रकार सांगितला. यानंतर डॉ. युवराज खराडे यांनी ही घटना जामखेड पोलिसांना सांगितली त्यामुळे सदरचा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून वरील सहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र वायफळकर, व शिवाजी कपणेसह तीन जणांना अटक केली असून या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करत आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!