#iifa2017 : शाहरूख यंदाच्या ‘IIFA 2017’ मध्ये दिसणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण?

0

येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अवॉर्ड्स म्हणजेच आयफा २०१७ मध्ये शाहरूख खान दिसणार नाही. याचे कारण म्हणजे शाहरूखचा मोठा मुलगा आर्यनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आणि यादरम्यान तो आपल्या मुलासोबत राहणार आहे.

यामुळेच २०१७ च्या आयफा पुरस्कार सोहळ्यात आपल्याला शाहरूख दिसणार नाही.

शाळेत फूटबॉल खेळताना आर्यनच्या नाकाचं हाड मोडलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावे लागणार असल्याचे सांगितले.

यासाठी एसआरकेसुद्धा परदेशी जाणार आहे. ही शस्त्रक्रिया जुलैमध्येच होणार असल्याने पुरस्कार सोहळ्याला न जाता आपल्या मुलासोबत राहण्याचे शाहरूखने निवडले. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

LEAVE A REPLY

*