‘आयएचजी’ ग्रुपच्या ‘हॉलिडे इन एक्‍स्‍प्रेस’ची नाशकात शाखा

0

नाशिक | प्रतिनिधी 

इंटरकॉन्टिनेन्‍टल हॉटेल्‍स ग्रुप (आयएचजी) या आघाडीच्‍या हॉटेल कंपनीकडून नाशिकमध्ये इंदिरा नगर परिसरात सुसज्ज अशी हॉटेल हॉलिडे इन एक्‍स्‍प्रेसची लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबत कंपनीकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

आयएचजीने मिडस्‍केल ब्रॅण्‍डसह शहरामध्‍ये पदार्पण केले. यामधून कंपनीची भारतातील प्रमुख शहरांमध्‍ये आपली मिडस्‍केल ऑफरिंग विस्‍तारणार आहे.

या हॉटेलमध्‍ये सिग्‍नेचर आदरातिथ्‍य, उत्‍तम डिझाइन व सेवेच्या वारशाचा समावेश आहे. यामुळे शहराला भेट देणा-या प्रत्‍येक अतिथीला सर्वोत्‍तम अनुभव मिळेल असा दावादेखील कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

या हॉटेलमध्ये १०१ सुसज्ज असे रूम्‍स आहेत. कारागीरांच्‍या सर्वोत्‍तम कार्यक्षमतेतून या रूम्सची सजावट करण्यात आली आहे.

या रुममध्ये उत्तम कनेक्‍टीव्‍हीटी मिलाल्वी यासाठी प्रत्‍येक रूममध्‍ये हाय-स्‍पीड इंटरनेट सेवा देण्यात आली आहे. हॉटेलमध्‍ये राहणारे अतिथी चविष्‍ट ब्रेकफास्‍टचा आस्‍वाद घेऊ शकतात. आपल्‍या दिवसाची सुरूवात ग्रॅब अॅण्‍ड गो पर्यायासह करु शकतात.

सुधारित ‘ग्रेट रूम’चे वैशिष्‍ट्य असलेल्‍या या हॉटेलमध्‍ये राहण्‍यासाठी व मनोरंजनासाठी भरपूर वाव आहे. तसेच या हॉटेलमध्‍ये अतिथींच्‍या अधिक सुविधेसाठी व्‍यायामशाळा व लॉन्‍ड्रीरूमदेखील आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर सोईस्‍कर असलेल्या ठिकाणी हे हॉटेल साकारण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. जिल्ह्यातील रतनगड, राम लक्ष्‍मण तिर्थ, वेद मंदिर टेम्‍पल आणि सिता गुफा अशा अनेक पर्यटनस्‍थळांपासून फक्‍त ५ किमी अंतरावर आहे. तसेच हे हॉटेल नाशिक रोड रेल्‍वे स्‍टेशनपासून २० मिनिटांच्‍या अंतरावर आहे.

यावेळी एसडब्‍ल्‍यूए, आयएचजीचे प्रादेशिक उपाध्‍यक्ष विवेक भल्‍ला म्‍हणाले, आम्‍हाला नाशिकच्‍या इंदिरा नगर येथील हॉलिडे इन एक्‍स्‍प्रेस हॉटेलच्‍या उद्धाटनाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. वर्षांनुवर्षे नाशिक हे आरामासाठी, तसेच व्‍यवसायानिमित्‍त प्रवास करणा-या पर्यटकांसाठी लोकप्रिय पर्यटन स्‍थळ म्‍हणून उदयास आले आहे. त्यामुळे या शहरात हॉटेल सुरु करण्याचा मानस होता. आज प्रत्यक्ष उद्घाटन होत असल्याने आनंद होत आहे.

LEAVE A REPLY

*