Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाडीवऱ्हे : अज्ञात ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Share

इगतपुरी : तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ काल रात्री (दि. १५ ) सव्वा आठच्या सुमारास रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान नाशिक ते मुंबईकडे जाणाऱ्या रस्ता सतत वर्दळीचा असतो. पाण्याच्या व शिकारीच्या शोधार्थ बिबटे येत असतात. काल रात्री सव्वा आठच्या सुमारास अज्ञात ट्रकच्या धडकेत एक वर्षाच्या मादीचा मृत्यू झाला आहे.

रात्री अज्ञात बाईक स्वाराचा कॉल आल्याने आम्ही तातडीने घटनास्थळावर जाऊन पहाणी केली. यावेळी बिबट्या रस्त्यावर पडलेला दिसून आला. तदनंतर शवविच्छेदन करण्यात आले असून इगतपुरी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
-रमेश ढोमसे, वनसंरक्षक, इगतपुरी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!