Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : जुन्या कसारा घाटात रस्ता खचल्याने वाहतुक संथ गतीने

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरीसह कसारा घाटपटयात गेल्या तीन-चार दिवसांपासुन संततधार व अतीवृष्टी होत असुन याचा फटका रेल्वे मार्ग व महामार्गालाही बसत आहे. नाशिक-मुंबई मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ( दि.२८ रोजी ) सकाळपासुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आल्याने महामार्गावर वाहतुक संथगतीने सुरु आहे.

मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुना कसारा घाटातील काही ठीकाणी रस्ता खचला आहे. मुसळधार पावसासह घनदाट धुक्यामुळे कसारा घाटात वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच आज कसारा घाटात रस्ता खचला असून, रस्त्याला भेगा पडल्या आहेत. घाटातील वाहतूक एकेरी मार्गावर सुरु आहे.

रस्ता खचलेल्या ठिकाणी टोलप्लाझाचे कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणुन बॅरिकेट लावले आहेत. वाहतूक एकेरी मार्गावरुन सुरु असुन वेळ पडल्यास नव्या कसारा घाटातून वाहतूक वळविण्यात येणार आहे. दरवर्षी घाटात या ठिकाणी रस्ता खचतो असे सांगण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!