Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | इगतपुरी : पर्यटन नगरीतील मुख्य रस्त्याची तीनच वर्षात चाळण

Share

इगतपुरी : पर्यटन नगरी म्हणून ओळख बनवू पाहणाऱ्या इगतपुरीतील मुख्य रस्त्यांची तीनच वर्षात चाळण झाली आहे. पर्यटक व स्थानिकांनी यावरुन इगतपुरी नगरपरिषदेवर रोष व्यक्त केला आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे सर्वांनाच कमालीची कसरत करावी लागत आहे.

दरम्यान इगतपुरी हे पर्यटन म्हणून नावारूपास येत असून तीनच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याची अशी चाळण झाल्याने नागरिकांच्या पैशाच्या वापर होतो कि नाही अशा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

स्थानिक रहिवासी समीर परदेशी यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच आम्ही रस्त्यावरील खड्डे बजावण्याचा प्रयत्न केला परंतु पाऊस झाल्याने पुन्हा तीच अवस्था झाली. ते म्हणाले,”स्थानिक प्रशासन कुठेतरी इगतपुरीच्या विकासात अडथळा आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचीच अशी अवस्था पाहुन पर्यटक तरी कसे येणार हाच मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अधिकारी या समस्यकडे कानाडोळा करतांना दिसत आहेत.

‘प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष दिले पाहिजे. रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे शहराच्या आर्थिक विकासाला खिळ बसते. इगतपुरी आता कुठे पर्यटनच्या दृष्टीने पुढे जाऊ पहाते आहे, त्यात प्रशासनाने देखील पुढाकार घ्यावा,” असे वक्त्यव्य पंकज रोकडे यानी केले.

रस्त्याच्या दुरा अवस्थेमुळे पाच मिनिटांचा प्रवास हा २० ते ३० मिनिटांचा झालेला आहे. यामुळे वाहनाच्या देखरेखीच्या खर्चात ही वाढ होत असल्याची बाब नागरिकांनी बोलून दाखविली. परिणामी शहराच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असून या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे ठरेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!