Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात पावसाचे थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे :

इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार मुसळधार पाऊसाने पूर्वभागात चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील नदीपात्रानी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दारणा धरणाची पातळी 25. 56 टक्क्यांनी वाढली आहे. ओंडओहोळ नदीपात्रावरील पुलावरून भयंकर पाणी असल्याने मुंढेगाव ते घोटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली तर जानोरी, बांडेवाडी आदी बारा वाड्याचा संपर्क तुटला आहे.  बेलगाव कुऱ्हे येथील नदीपात्राला पूर आल्यामुळे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली होती. मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात रोपांची नुकसान झाली आहे. लष्कर हद्दीतून आलेले पुराचे पाणी एकरूप झाल्याने अस्वली स्टेशन परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला आहे.

ओंडओहोळ नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहनधारकांना यामुळे माघारी फिरावे लागले. सतत रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. परिसरातील अस्वली स्टेशन, जानोरी, बारा वाड्या संपर्क तुटला आहे. परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बेलगाव कुऱ्हे येथील नदीपात्र ओहरपलो झाले होते तर ओंडओहोळ नदीपात्र ओसंडून वाहत होते

दरम्यान अजून मुसळधार पाऊस पडला तर परिसरातील संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेले नसल्यामुळे नागरिकांना धोक्याच्या सूचना मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रया नागरिकांनी व्यक्त केल्या. नदीशेजारी विजपंपात पुराचे पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे विजमीटर निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन मिटरसाठी मोठा भुर्दंड बसणार आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेले नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा काय करीत आहे? अशा प्रश्नांचा भडीमार संतप्त नागरिकांनी व्यक्त केला.

सन 2006 च्या कालखंडात तालुक्याच्या पूर्वभागातील अस्वली स्टेशन येथे अतिवृष्टीने मोठा कहर केला होता.अनेक गावे पाण्याने वेढली गेली होती. हे कदापिही विसरून चालणार नाही या पार्श्वभूमीवर आपात्कालीन परिस्थितीवर मात करणारी यंत्रणा अजूनही सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी होऊन शेतीचे बांध फुटले आहेत. याबरोबरच भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.                                                                                                                        -विजय महाले, शेतकरी अस्वली स्टेशन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!