Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : मालवाहतूक गाडीचे इंजिन रेल्वे स्थानकाजवळ घसरले

Share

इगतपुरी । वार्ताहर :
इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ७. ५० चे सुमारास रुळावरून घसरले.

या अपघाताची माहीती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माल वाहतुकीचे डबे इंजन पासून मोकळे केले.

त्यानंतर मालवाहतूक गाडी परत रेल्वे यार्डात रवाना करण्यात आली. घटनेचे कारण अद्याप समजले नसून रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे रुळावरून घसरलेले इंजिन हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परीणाम झाला नसुन मध्य रेल्वेची अप व डाऊन मार्गाच्या वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम झाला नसून सर्व गाड्या वेळेवर धावत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!