Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : एसएमबीटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत रुग्णाची आत्महत्या

Share

इगतपुरी : तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून थेट उड़ी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तुकाराम वाळवू थोरात (वय ४५) रा. मुरबाड, जि. ठाणे असे या रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी वाडीव-हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, थोरात हे १६ ऑगस्ट रोजी एस एम बी टी रुग्णालयात भरती झाले होते. डायबेटिस आणि हायपर टेंशन आदी विकाराने ते त्रस्त होते. यातूनच त्यांनी आज दुपारी दीड वाजता रुग्णालयातील कर्मचा-यांची नजर चुकवून थेट चौथ्या मजल्यावर चढले आणि उड़ी घेवून आत्महत्या केली.

या बाबतची खबर रुग्णालयाच्या वतीने वाडीव-हे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत पंचनामा करुन थोरात यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.

पुढील तपास वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!