इगतपुरी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

0

इगतपुरी  ( विशेष प्रतिनिधी) दि.. 7 : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी विद्यालयात  शाडू मातीपासून पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुबक गणेश मूर्ती साकारल्या.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन आणि शाडूच्या मातीचे पूजन करून गणपती तयार करण्याची कार्यशाळा सुरू झाली.

कागदाचा बोळा तयार करून त्याचा आधार घेत शाडू मातीच्या लेपनाने सुंदर आकर्षक मुर्ती तयार करण्याची सोपी पध्दत मुलांना सांगण्यात आली.

सुमारे २०० गणेशमूर्ती तयार झाल्या. त्यांना नैसर्गिक रंगही देण्यात आले. मुलांच्या कलागुणांना या कार्यशाळेतून वाव मिळतो.

त्यांनी तयार केलेल्या आकर्षक मूर्तींतून एकीची निवड करून शालेय गणेशोत्सवात तिची स्थापना केली जाते, अशी माहिती  प्राचार्य सुहास खरोटे  यांनी दिली.

चित्रकला शिक्षक सोनाली मोरे, विनोद जांभोरे ,व आशोक इंफाळ यांच्या मार्गदर्शनखाली  कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना शाडूमातीची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

LEAVE A REPLY

*